Home अर्थजगत भारतात सापडले सोन्याचे घबाड! योगी सरकार होणार मालामाल!!

भारतात सापडले सोन्याचे घबाड! योगी सरकार होणार मालामाल!!

0

उत्तरप्रदेश मधील सोनभद्र जिल्ह्यात तब्बल  ३.५० टन सोने  खनिज स्वरूपात सापडले आहे. सापडलेल्या सोन खनिजाचा हा साठा भारताच्या सध्याच्या साठ्यापैकी पाचपट आहे असे ‘Geological Survey of India’ यांच्या प्राथमिक अंदाजावरून सांगण्यात येत आहे. या सोन्याच्या साठ्यांचा तब्बल २ दशकाहून अधिक काळ शोध घेतल्यानंतर GSI ला हे साठे शोधून काढण्यात यश आले आहे. सोनभद्र हा जिल्हा नक्षलवाद प्रभाव क्षेत्र असून या सोन्याच्या खाणीनंतर उत्तर प्रदेश सरकार मालामाल होणार आहे. लवकरच या खाणींच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.

सोन्याच्या या खाणी उत्तर प्रदेश येथील सोनभद्र जिल्ह्यात हल्दी खेडे आणि दुधी तहसिल येथील माहुली खेड्याजवळील सोनपहाड येथे सापडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार हे अधिकारी अतिदुर्मिळ युरेनियमचा सुद्धा शोध इथे घेत आहेत. या भागात युरेनियमचे सुद्धा साठे आहेत असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. २००५ मध्ये सोनभद्र येथे सोने आहे असा अंदाज GSI ने लावला होता. त्यानंतर २०१२ साली त्यांनी त्याची खात्री दिली.
या सोन्याच्या खाणींच्या लिलावानंतर उत्तरप्रदेशचे योगी सरकार मालामाल होणार आहे हे नक्की!