
माजी मुख्यमंत्री तसेच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची आज सदिच्छा भेट घेतली, या भेटीमागे राज्य सरकार आवश्यक उपाययोजना करत नसल्याने “महाराष्ट्र बचाओ!” आंदोलनाची सुरवात म्हणून भेट घेतली असल्याचे कळत आहे.
भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडिया समोर येत सांगितले की, ” राज्य सरकार हे कोरोना लढा देण्यास सपशेल हरले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आपण वाचवायला हवे, देशामध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रातच कशी आहे हे विचार करण्यासारखे आहे.”
फडणवीस पुढे म्हणाले, “मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोना रुग्ण सोडून इतर रुग्णांना उपचारासाठी रुग्णवाहिका मिळत नाहीत, हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नाही आणि परिणाम म्हणून रुग्णांचा मृत्यू होत आहे. सरकार याबद्दल काहीच करताना दिसत नाही. रुग्णवाहिका आणि हॉस्पिटल बेड साठी एक डॅशबोर्ड सुरू करावा जेणेकरून लगेच समजेल की कुठल्या रुग्णालयात उपचारासाठी जागा आहे.”
फडणवीसांनी पुढे शरद पवारांना प्रश्न विचारत म्हटले की,” तुम्ही नरेंद्र मोदींना पत्र लिहून मदत मागता तसे उद्धव ठाकरेंना सुद्धा पत्र लिहा, केंद्र सरकार रेल्वेचे ८५% भाडे भरत असताना सुद्धा तुम्हाला साधी आकडेवारी येत नाही!”
देवेंद्र फडणवीसांच्या अशा आक्रमक पवित्र्यानंतर काँग्रेस नेते नवाब मलिकांना प्रश्न विचारला असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली, ” हा आंदोलन करण्याचा काळ आहे का? राजकारण आणि आंदोलनचं करायचे असतील तर आम्ही सुद्धा सक्षम आहोत. ज्या वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोणाची महामारी म्हणून घोषणा करण्यात आली त्यावेळी नरेंद्र मोदींना मात्र ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम करायचा होता. त्याच वेळी विमानांवर बंदी घातली असती तर ही वेळ आली नसती, म्हणजेच नरेंद्र मोदी यांनीच कोरोनाला भारतात आणले!”