Home महाराष्ट्र परीक्षा ज्यांना द्यायची आहे ते देऊ शकतात, सरसकट परीक्षा रद्द नाही :...

परीक्षा ज्यांना द्यायची आहे ते देऊ शकतात, सरसकट परीक्षा रद्द नाही : उदय सामंत

0

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या मुद्द्यावर देशभरात खडाजंगी सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सरकार तर केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाच्या पूर्णपणे विरोधात आहे. आज उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कालपर्यंत सरकार विद्यापीठ आयोगाला पूर्णपणे विरोध दाखवत होते, आज मात्र त्यांनी परीक्षा ऐच्छिक होईल असे जाहीर केले आहे.

उदय सामंत यांनी आज या बाबत घोषणा करत पुढील महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत,” आम्ही जो परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तो कुलगुरूंच्या शिफारस नुसार आहे. या निर्णयावर राज्यातील १३ कुलगुरूंच्या स्वाक्षरी आहेत. दरम्यान आम्ही राज्यपाल कोशियारी यांच्या सोबत चर्चा केली तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सोबत चर्चा झाली आणि परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या वेळी केंद्र सरकारने राज्यांनी परीक्षांचा निर्णय घ्यावा असे जाहीर केले होते, आता मात्र त्यांनी विद्यापीठ आयोगाला त्यांनी वेगळ्या सूचना केल्या आहेत”

विद्यापीठ आयोगाने शक्य होईल तर ऑनलाईन परीक्षा घ्या पण परीक्षा व्हायलाच हव्यात असे जाहीर केले आहे तर राज्य सरकार आणि उच्च शिक्षण मंत्रालय यांच्या म्हणण्यानुसार सदर परीक्षा देणे ऐच्छिक असणार असून ज्यांना द्यायची आहे ते देऊ शकतात. सदर वाक्यांमुळे विद्यार्थी आणि पालक गोंधळलेले आहेत, आणि परीक्षा दिली नाही तर काय होणार या बाबत कुठलीही ठोस माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे एकंदर संभ्रमावस्था आहे.