Home खेळ स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मिळेना स्पॉन्सर आता शर्टवर आफ्रिदीचे नाव लिहून भागवणार!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मिळेना स्पॉन्सर आता शर्टवर आफ्रिदीचे नाव लिहून भागवणार!

0

आगामी क्रिकेट दौऱ्यासाठी पाकिस्तानि संघ हा इंग्लड ला पोहोचला असून तो सराव करत आहे, पण या दौऱ्यासाठी पाकिस्तानी बोर्डाला स्पॉन्सर सापडत नाही आहे. विना स्पॉन्सरचे सामने कसे खेळवणार हा पेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डसमोर पडला आहे. जर्सीवर स्पॉन्सर च्या लोगोची जागा रिकामी राहिल्यामुळे तिथे शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन चे नाव लिहून सदयापुरते पुरते भागवणार आहेत अशी माहिती मिळते.

कोरोना व्हायरसच्या संकटात आधीच आर्थिक स्तिथी नाजूक असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला स्पॉन्सर मिळवणे अत्यंत आवश्यक झाले असून ते महिन्यांपासून त्याच्या शोधात आहेत, अखेर बुधवारी त्यांनी त्याला स्पॉन्सर मिळत नसल्याची कबुली दिली आहे.

पाकिस्तान आणि इंग्लड संघांमध्ये ३ कसोटी सामने तर ३ T 20 सामने खेळवले जाणार आहेत. सद्या सुरू असलेले वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लड सामने संपल्यानंतर पाकिस्तान संघसोबत इंग्लड खेळेल. या अगोदर पाकिस्तानी खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाच ऑगस्ट पासून पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार असून हा सामना विना प्रेक्षकांचा खेळवण्यात येणार आहे.