Home महाराष्ट्र “तो मी नव्हेच” अशी भूमिका घेतल्याने इंदुरीकर महाराजांवरची कारवाई तात्पुरती टळली

“तो मी नव्हेच” अशी भूमिका घेतल्याने इंदुरीकर महाराजांवरची कारवाई तात्पुरती टळली

0
indurikar maharaj

प्राईम नेटवर्क : प्रसिद्ध आणि वादग्रस्त कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर, यांना सायबर सेलकडून तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. सध्या इंदुरीकर महाराजांचा वादग्रस्त व्हिडिओ ऑनलाईन उपलब्ध नसल्याने सायबर सेल ने इंदुरीकरांना दिलासा दिला आहे. यानंतर इंदुरीकर महाराजांनी तो मी नव्हेच, अशी भूमिका घेत आपण कुठल्याही कीर्तनात असं वक्तव्य केलंच नाही, असं म्हटलंय.

मात्र इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या कीर्तनावेळी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिथी नुसार, एकत्र आल्यास, मुलगा किंवा मुलगी संतती होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. ज्यामुळे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणांहून इंदुरीकरांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती. नगर मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकरांच्या या वक्तव्या वर आक्षेप घेत, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या नंतर आरोग्य विभागाने इंदुरीकर महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सध्या इंदुरीकर महाराजांनी तो मी नव्हेच अशी जाहीर भूमिका घेतल्याने, इंदुरीकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.