Home राष्ट्रीय ट्रम्पच्या दौऱ्यासाठी अहमदाबादमधील ४५ घरे रिकामी करण्याचे आदेश 

ट्रम्पच्या दौऱ्यासाठी अहमदाबादमधील ४५ घरे रिकामी करण्याचे आदेश 

0

 येत्या २४ फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत हे आपण ऐकलेच. त्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम साजरा होणार आहे. त्यामुळे तेथील झोपडपट्टी विभाग झाकण्यासाठी त्यांच्यासमोर भिंत उभारण्यात आली आणि आता तेथील ४५ कुटुंबाना ७ दिवसांच्या आत घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमच्या आवारात जवळपास ४५ कुटुंबांची घरे आहेत जिथे २०० लोक वास्तव्यास आहेत. ट्रम्पच्या दौऱ्यासाठी या लोकांना ७ दिवसांच्या आत घरे रिकामी करून स्थलांतरित होण्याची नोटीस अहमदाबाद महानगरपालिकेने पाठवली आहे. लोकमतच्या रिपोर्टनुसार हे सर्व लोक नोंदणीकृत बांधकाम मजूर असून गेल्या २० वर्षांपासून तेथे वास्तव्यास आहेत. ट्रम्पच्या कार्यक्रमासाठीच महानगरपालिकेने घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली असा दावा या लोकांनी केला असून अहमदाबाद महानगरपालिकेने ट्रम्पच्या कार्यक्रमाशी या नोटिसचा काहीही संबंध असे सांगून दावा फेटाळला. हे लोक राहत असलेली जमीन महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.