Home राष्ट्रीय ब्रेकिंग न्युज : दुबईहून कोझिकोडे येथे येणाऱ्या विमानाचा मोठा अपघात!

ब्रेकिंग न्युज : दुबईहून कोझिकोडे येथे येणाऱ्या विमानाचा मोठा अपघात!

0

केरळमधील कोझिकोड येथे उतरणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा खूप मोठा अपघात झाला आहे. हे विमान दुबईहून केरळ येथे येत होते. हे विमान आय एक्स 1344 होतं. कोझिकोड मध्ये धावपट्टीवर उतरत असताना या विमानाचा अपघात झाला आहे.

त्यामध्ये त्या विमानात 191 प्रवासी होते. विमानाचा तोल संभाळल्या न गेल्याने ते दरीत जाऊन दोन तुकडे झाले. त्यामध्ये पायलटचा मृत्यू झाला असून खूप लोक जखमी आहेत. तसेच अनेक लोक बेशुद्ध अवस्थेत आहेत.

केरळमध्ये गेले काही दिवस खूप पाऊस पडत होता. तसेच आजही अपघातानंतर पावसाचे चित्र दिसून आले आहे. अद्याप नक्की किती लोक जखमी आहेत हे कळू शकले नसले तरी लोकांच्या अवस्थेवरून हा खूप मोठा असल्याचे समजत आहे. तसेच प्रवाशांना बाहेर सुखरूप काढण्यात आलं आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस, लोकल पोलीस ,NDRF, तसेच तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एअर पोर्ट वर धाव घेतली आहे.