Home राष्ट्रीय आता स्मार्टफोनमध्ये घरीच बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण प्रक्रिया

आता स्मार्टफोनमध्ये घरीच बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण प्रक्रिया

0

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशभरात ‘वन नेशन वन रेशन’ हे धोरण लागू झाल्यापासून प्रत्येकाला रेशन कार्ड बनवणे अत्यावश्यक झाले आहे. केवळ रेशनचे धान्य मिळवण्यासाठीच नाही तर ओळखपत्र म्हणून देखील रेशन कार्डाचा उपयोग होतो. रेशन कार्ड नसणारे तर आता स्मार्टफोन द्वारे घरबसल्या रेशन कार्ड बनवून घेऊ शकतात. रेशन कार्ड च्या ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी सर्व राज्यांनी स्वतंत्र संकेतस्थळे बनवली आहेत.

उपयुक्त कागदपत्रे:
स्मार्टफोन वरून रेशन कार्ड साठी अप्लाय करण्यासाठी ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलेही ओळखपत्र, पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ऍड्रेस प्रूफ साठी टेलिफोन बिल, बँक पासबुक, इलेक्ट्रिसिटी बिल यापैकी एक अशी सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया:
अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्या राज्याच्या वेबसाईटवर जा. तेथील Apply online for ration Card या लिंकवर जा. वरील दिलेल्या कागदपत्रांपैकी उपलब्ध असलेली आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर अर्जासाठी लागणारे शुल्क भरून सबमिट करा. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल. अर्ज पूर्ण करण्यासाठी ५ ते ४५ रुपये इतके शुल्क लागेल.

अर्ज करण्यासाठी पात्रता:
अप्लाय करणारी व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे. इतर कुठल्या राज्याचे रेशन कार्ड त्या व्यक्तीकडे नसावे. व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.