Home जागतिक चीनला आणखी एक मोठा दणका; गुगलने चीनचे २५०० युट्यूब चॅनेल्स केले डिलिट!

चीनला आणखी एक मोठा दणका; गुगलने चीनचे २५०० युट्यूब चॅनेल्स केले डिलिट!

0

सगळीकडून चीनवर करण्यात येणाऱ्या digital strike मध्ये आता एक नवीन बातमी समोर आली आहे. आधीच भारताने चीनचे ५९ अँप्स बंद केले. तसेच अमेरिका देखील चीनच्या शॉर्ट व्हिडिओ टिक टॉक अँपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

हे सगळं चालू असतांना गुगलने चीनशी संबंधित असलेल्या २५०० युट्यूब चॅनेल्स डिलीट करण्यात आले आहेत. या युट्यूब चॅनेल्स वर खोटी व भ्रमक माहिती पसरवली जात असल्याचे गूगल ने सांगीतले.

युट्यूब ने सांगितले की या चॅनेल्स वर स्पॅम व नॉन पोलिटिकल कंटेंट्स पोस्ट केले जात होते. तसेच हे चॅनेल्स एप्रिल ते जून मध्ये युट्यूब वरून हटविण्यात आले आहेत असे कंपनीने सांगितले. असे चीनसंदर्भात सुरू असलेल्या इन्फ्लूएंस ऑपरेशन्स अंतर्गत करण्यात आले आहे.

सोशल मीडिया एनालिटिक्स कंपनी ग्राफिकाने सांगितले की ही चॅनेल्सवर राजकारणाशी संबंधित माहिती सुद्धा पोस्ट केली जाते . तसेच ट्विटरवर देखील अशीच ऍक्टिव्हिटी असणारे ट्विट आढळून आले आहे,त्यांचा तपास घेणे हे सुरू आहे.