
एकीकडे चीन लष्करी सामर्थ्य दाखवत आहे आणि दुसरीकडे दक्षिण समुद्रात अनेक प्रदेशांवर हक्क सांगत आहे. पण अनेक देशांशी असलेले संबंध चीन उकरून काढणे थांबवलेले नाही यातच चीनला एक मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडीओमध्ये चिनी लष्कराचा अँफिबियस रणगाडा पाण्यात बुडताना दिसत आहे. रणगाडा पाण्यात आणि जमिनीत अतिशय सक्षम आहे. मात्र या व्हिडीओमुळे चीनच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.या सगळ्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीची पोलखोल झाली आहे.
पाण्याच्या आतमध्ये असलेले ते टँकर अचानक हल्ला करणे किंवा एखाद्या संशयास्पद वाहनास आवश्यक असल्यास नदी ओलांडण्यापासून थांबविणे असते. पण तसे नसून ते कोणत्यातरी प्रदेशावर हक्क सांगत आहे असा आरोप करण्यात आला आहे. तसेच टँक तयार करण्यासाठी निकृष्ठ दर्जाचे स्टील वापरण्यात आले आहे, त्यामुळे ते पाण्यात बुडाले आहे.