Home आरोग्य चीनमधून महाभयंकर बातमी, मृत्यू अटळ असणाऱ्या प्लेग रोगाची साथ आल्याने खळबळ

चीनमधून महाभयंकर बातमी, मृत्यू अटळ असणाऱ्या प्लेग रोगाची साथ आल्याने खळबळ

0

उत्तर चीनमधील मंगोल प्रांतात बयांनुर या शहरामध्ये लेव्हल 3 चा धोका जाहीर करण्यात आला आहे, या शहरात एकामागोमाग एक काळा रोग म्हणजेच प्लेगची लक्षणे दिसून आली असून ह्या रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रसार होण्याची चिन्हे आहेत. प्लेग या महाभयंकर आजाराने १४व्या शतकात ६०% जनता मृत्युमुखी पडली होती. आता या आजाराचा पुनःश्च हरिओम झाल्यावर जगभरात सर्वांच्या अंगावर काटा आला आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र xinhua यामध्ये सदर आजाराचे रुग्ण सापडल्याचे सविस्तर वृत्त देण्यात आले असून, या रोगाच्या प्रसारावर कसे निर्बंध घालण्यात येणार आहेत याची माहिती दिली आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्लेग आजारामुळे कुठल्याही मनुष्याचा संक्रमण झाल्यावर २४ तासाच्या आत मृत्यू होतो. हा आजार प्रामुख्याने उंदीर, घुस प्राण्यांमार्फत खाद्यपदार्थ आणि घाणीवर राज्य करणाऱ्या माशांमार्फत पसरला जातो. एकदा संक्रमण झाल्यावर माणसाच्या बगलेमध्ये गाठ येऊन २४ तासाच्या आत त्याचा मृत्यू होतो.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते पुरेसे अन्न आणि पैसे मिळत नसल्याने चीनमधील लोक उंदीर, घुशी, साप या सारख्या गोष्टींचे सेवन करत आहेत, यामध्ये त्यांच्या ऎतेहासिक परंपरांचा सुद्धा सहभाग आहे. पण सदर गोष्टींमुळे महाभयानक साथीच्या रोगांना चालना मिळाली आहे.

काय आहेत काळा आजार म्हणजेच प्लेग ची लक्षणे:
गळा, बगल, किंवा मानेवर गाठ येते ही गाठ कोंबडीच्या अंड्याइतपत मोठी असू शकते. सोबतच ताप ,थंडी, थकवा जाणवणे आणि स्नायू दुखणे अशी लक्षणे आहेत.