Home Uncategorized मालेगाव-देवळा रस्त्यावर भीषण अपघात, दोनही वाहने प्रवाशांसह विहिरीत कोसळली!

मालेगाव-देवळा रस्त्यावर भीषण अपघात, दोनही वाहने प्रवाशांसह विहिरीत कोसळली!

0

नाशिक : मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात यांच्यात भीषण अपघात झाला असून दोनही वाहने प्रवाशांसह एका विहिरीत कोसळली आहेत. या जोरदार अपघातात एकूण सात जण ठार झाले आहेत अशी माहिती मिलत आहे मात्र मृतांची संख्या वाढू शकते असही म्हटलं जात आहे. या अपघाता दरम्यान १९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे

महाराष्ट्र टाईम्सच्या एका रिपोर्ट नुसार एसटी बसचा टायर फुटल्याने, बसचा तोल गेल व चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने अपे रिक्षाला धडक दिली. ही बस कळवण डेपोची उमराणे – देवळा बस होती. अपघातानंतर बस व रिक्षा दोन्ही वाहने एका विहिरीत कोसळले. तात्काळ घटनास्थळी फार जमाव झाला व स्थानिकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.